बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडे – धनंजय मुंडे आमने-सामने

बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडे – धनंजय मुंडे आमने-सामने

बीड- परळी बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे रिंगणात उतरले आहे. परळी बाजार समितीच्या 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपसोबत संघर्ष करताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी करुन ही निवडणूक लढत आहेत. या निवडणुकीसाठी दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली  आहे.

गेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे.पंडितअण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला. आता गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णा नसल्यामुळे त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे रिंगणात उतरले आहे. निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आपल्या पॅनलला गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिले आहे, तर धनंजय यांनी आपल्या पॅनलला पंडित अण्णा यांचे नाव दिले आहे.

परळी नगरपालिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धनंजय मुंडेंना यश मिळाल्यानंतर त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही पंकजा मुंडेंचा मोठा पराभव धनंजय मुंडेंनी केला होता. आता बाजार समितीच्या निवडणुकीत हे दोघेही पुन्हा समोरासमोर उभे आहेत.

 

COMMENTS