बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

बारावीचा निकाल उद्या (मंगळवारी) लागणार असल्याचे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज (सोमवारी) जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बारावीच्या निकालासंदर्भात अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यामुळे आज बोर्डाने अखेर तारीखेची घोषणा केली आहे. विद्यार्थी आणि पालक अनेक दिवसांपासून या बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.

 

उद्या बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे.

 

या वेबसाईटवर निकाल पाहता येतील…

www.mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exam

COMMENTS