बारावी परीक्षेचा निकाल जाहीर;  राज्यात मुलींची तर विभागात कोकणाची बाजी

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यात मुलींची तर विभागात कोकणाची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२ वीचा निकाल आज जाहीर झाला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला असून, उत्तीर्ण होण्यात मुलींची टक्केवारी अधिक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा निकाल 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. तर गुणपत्रिका 9 जून रोजी दुपारी तीन नंतर महाविद्यालयांमध्ये मिळणार आहेत.

विज्ञान शाखा – 95.85 टक्के  कला शाखा   – 81.91 टक्के , वाणिज्य शाखा – 90.57   टक्के.
विभाग निहाय निकाल –  कोकण – 95.20 टक्के, कोल्हापूर-91.40 टक्के, पुणे-91.16 टक्के, औरंगाबाद- 89.83 टक्के, अमरावती- 89.12 टक्के, नागपूर-89.05 टक्के, लातूर- 88.22 टक्के, नाशिक- 88.22 टक्के आणि मुंबई – 88.21 टक्के.

COMMENTS