बार्शी – राष्ट्रवादीचे उद्या धरणे आंदोलन

बार्शी – राष्ट्रवादीचे उद्या धरणे आंदोलन

सोलापूर – बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्या विरोधात बाजार समितीतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारावर ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. आमदार दिलीप सोपल यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचा आरोप करत उद्या राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी प्रकरणे राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस या पुढेही तीव्र आंदोलन करेन असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे.

COMMENTS