बीडच्या शेतक-याची हवामान खात्या विरोधात पोलिसात तक्रार !

बीडच्या शेतक-याची हवामान खात्या विरोधात पोलिसात तक्रार !

बीड येथील एका शेतक-याने पुणे आणि कुलाबा वेधशाळे विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. शेतकरी गंगाभिषण थावरे यांनी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 

खते, बियाणे आणि फवारणी औषध निर्मिती कंपनीबरोबर संगनमत करून 2017 च्या खरीप हंगामात चांगला पाऊस पडेल असा खोटा अंदाज  पुणे आणि कुलाबा हवामान खात्याने वर्तविल्यामुळे  थावरे यांनी तक्रार दाखल केली आहे.

कंपन्यांचा फायदा व्हावा म्हणून जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल असा खोटा अंदाज हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.  पावसाचा खोटा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.  हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते, फवारणी औषधांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.  हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून शेतकऱ्यांनी पेरणी केली . मात्र पाऊस चांगला न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यामुळे पावसाचा खोटा अंदाज वर्तवणा-या अधिका-यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

 

COMMENTS