बीड – गोपीनाथ गड असलेली ग्रामपंचायत धनंजय मुंडेंच्या ताब्यात !

बीड – गोपीनाथ गड असलेली ग्रामपंचायत धनंजय मुंडेंच्या ताब्यात !

बीड – परवा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. बीड जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. ज्या ग्रामपंचायतच्या हद्दीत गोपीनाथ गड आहे त्या पांगरी ग्रामपंचायतीवर धनंजय मुंडे यांच्या समर्थक पॅनलचा विजय झाला आहे. पांगरीमध्ये सरपंचपदी धनंजय यांच्या गटाच्या अक्षता सुशिल कराड या विजयी झाल्या आहेत. तर 12 सदस्यांपेकी 10 सदस्य हे धनंजय मुंडे गटाचे निवडणू आले आहेत.

COMMENTS