बीड: जि.प. अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीला मोठा धक्का, सात सदस्यांचा भाजपला पाठिंबा

बीड: जि.प. अध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीला मोठा धक्का, सात सदस्यांचा भाजपला पाठिंबा

बीड लक्ष्मीकांत रुईकर

 

उद्या होणाऱ्या बीड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे, माजीमंत्री सुरेश धस यांनी आपल्या पाच आणि समर्थक दोन अशा सात सद्सयनासह भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे केवळ 20 सदस्य निवडून आलेल्या भाजपला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे, तर 26 सदस्य असलेल्या राष्ट्रवादीला हाबाडा बसणार हे नक्की.

 

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे 26 तर भाजपचे 20 सदस्य निवडून आले, काँग्रेस 3, शिवसेना आणि शिवसंग्राम प्रत्येकी 4 सदस्य निवडणून आले, पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपकडून फारश्या हालचाली होत नव्हत्या, राष्ट्रवादीने माजीमंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला सोळंके यांचे नाव अध्यक्ष पदासाठी निश्चित केले होते, त्यांच्याकडे 26 अधिक काँग्रेसचे 3 आणि संदीप क्षीरसागर यांच्या काकू नाना आघाडीचे 3 असे 32 एवढे संख्याबळ होते. त्यामुळे अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार हे मानले जात होते.

 

दरम्यान, राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली असून सुरेश धस यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट घेत भाजपला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहुमताच्या जवळ असूनही राष्ट्रवादीला दगाफटका होण्याची चिन्हे आहेत.

 

बीड जिल्हा परिषद

राष्ट्रवादी 25+एक अपक्ष  – 26

भाजपा   – 19+1 =20

शिवसेना  – 4

शिवसंग्राम  – 4

काँग्रेस  – 3

काकू नाना आघाडी – 3

एकूण जागा  – 60

COMMENTS