बेस्ट कर्मचारी 23 जूनपासून संपावर…

बेस्ट कर्मचारी 23 जूनपासून संपावर…

 मुंबई – बेस्ट कर्मचा-यांचे वेतन थकल्यामुळे 22 जूनच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार न देण्याच आल्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मे महिन्याचे निम्मेच वेतन देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे 23 जूनपासून मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कामगार न्यायालयाच्या निर्देशांनुसार महिन्याच्या 20 तारखेपर्यंत वेतन मिळायला हवे. मात्र बेस्ट प्रशासनाने केवळ 50 टक्के वेतन देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 22 जुनपर्यंत पूर्ण वेतन न मिळाल्यास कर्मचारी मध्यरात्रीपासून काम थांबवतील, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी दिला. त्यामुळे याचा फटका मुंबईतील लाखो लोकांना बसू शकतो. लोकल जरी मुंबईकरांसाठी लाईफलाईन असली, तरी त्या खालोखाल बेस्ट सेवेचा क्रमांक लागतो. लाखो मुंबईकर बेस्ट बसने प्रवास करतात. त्यामुळे बेस्ट कर्मचारी संपावर गेल्यास मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान, बेस्टला तोटा होत असल्याने बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती फारशी उत्तम नाही, त्यामुळेच मे महिन्याचे निम्मेच वेतन देण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.

COMMENTS