‘ब्लू वेल गेम’वर बंदीची विधानसभेत मागणी, मुंबईत पहिला तर जगभरात शेकडो बळी !

‘ब्लू वेल गेम’वर बंदीची विधानसभेत मागणी, मुंबईत पहिला तर जगभरात शेकडो बळी !

मुंबई – ब्लू वेल या इंटरनेटवरील जीवघेण्या गेममुळे काल मंबईत अंधेरीतील एका मुलाने आत्महत्या केली. याचे पडसाद सर्वच स्तरातून उमटत आहेत. विधानसभेतही या गेमबाबत चिंता व्यक्त करुन बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली. या गेममुळे लहान मुलांना आत्महत्येला प्रवृत्त केलं जात असल्याचं सांगत त्यांनी देशपातळीवर बंदी घालण्यासाठी प्रय़त्न करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही या गेममुळे आत्महत्या झाल्याचं सांगत याची पूर्ण चौकशी करु असं सांगितलं. तसंच हा गेम बंद करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करु असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिलं. आजपर्यं जगात या गेममुळे जगात शेकडो मुंलांचा बळी घेतला आहे.

COMMENTS