भाजपची स्वारी, सोनियांच्या दारी !

भाजपची स्वारी, सोनियांच्या दारी !

दिल्ली – राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वसहमतीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपनं ज्येष्ठ नेत्यांची एक समिती नेमली आहे. ही समिती विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहे. आता भाजपची ही समिती काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहे. राष्ट्रपती पदासाठी सर्वसहमतीने उमेदवार ठरावा अशी भाजपची भूमिका आहे. त्याचाच भाग म्हणून ही भेट ठरलेली आहे. येत्या शुक्रवारी भाजपचे नेते सोनियांच्या भेटीसाठी जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी त्या बैठकीत चर्चा झाली होती. त्या बैठकीला विरोधी पक्षातले सर्व नेते उपस्थित होते.

COMMENTS