भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लिहिणार मराठ्यांचा इतिहास !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लिहिणार मराठ्यांचा इतिहास !

पुणे – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आता मराठ्यांचा इतिहास लिहिणार आहेत. गुजरात भाषेत ते मराठ्यांचा इतिहास लिहिणार आहेत. त्यासाठी गेले सहा महिने अमित शहा मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करत आहेत. भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनीच ही माहिती दिली आहे.

शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली एवढाच इतिहास गुजरातमध्ये माहित आहे. त्यामुळे गुजरातमधील जनतेला शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिसास सविस्तरपणे समजावा यासाठी गुजरातीमध्ये मराठ्यांचा इतिहास लिहण्याचा निर्णय अमित शहा यांनी घेतला आहे. भाजप राजकारणामध्ये कशासाठी या पुस्तकाचं पुण्याचा बालगंधर्व रंगंदिरात आज प्रकाश झालं. हे पुस्तकही अमित शहा यांनी लिहिलं आहे. अमित शहा यांच्या पुढच्या पुस्तकाची माहिती देताना सहस्त्रबुद्धे यांनी ही माहिती दिली.

COMMENTS