भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या कंपनीला 474 कोटींचा दंड

भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या कंपनीला 474 कोटींचा दंड

आमदार मंगलप्रभात लोढा यांनी वडाळा येथील 5700 कोटी रुपयांच्या जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क न भरल्याने 474 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. येत्या 30 दिवसांत हा मुद्रांक शुल्क न भरल्यास कारवाईचा इशाराही मुद्रांक शुल्क विभागाने दिला आहे.

मुंबईतील वडाळा येथे ‘न्यू कफ परेड’ नावाच्या निवासी आणि व्यावसायिक वसाहतीचे बांधकाम लोढा समूहाने सुरू आहे. 9.96 लाख चौरस फूट भूखंडावर 1200 अपार्टमेंट उभारले जात आहेत. लोढा यांच्या याच प्रकल्पाच्या मुद्रांक शुल्काबाबत प्रश्नचिन्ह असल्याने त्यांना दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोढा यांचा मुलगा अभिषेक हे लोढा समुहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर मंगलप्रभात लोढा हे समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि मुद्रांक शुल्क विभागाने काढलेल्या आदेशाच्या प्रती एका इंग्रजी दैनिकाकडे उपलब्ध आहेत. अभिषेक लोढा यांनी मात्र मुद्रांक शुल्क विभागाच्या आदेशाला आव्हान देणार असल्याचे सांगितले.

 

COMMENTS