भिवंडी, मालेगाव आणि पनवेल  महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

भिवंडी, मालेगाव आणि पनवेल महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

रायगड जिल्ह्यातील पनवेल महापा‌लिकेसह ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-निजामपूर आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मालेगाव  दुपारी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 41% मतदान तर पनवेलमध्ये  आतापर्यत 34 टक्के मतदान झाले. भिवंडीत आतापर्यत  सरासरी 36 टक्के मतदान झाले. मालेगावात मतदानादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाली असून त्यात दोघे जखमी झालेत.
धारणी पंचायत समिती, नागभीड नगरपरिषद, नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध सात नगरपरिषदांतील 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीही आजच मतदान होत आहे. सर्व ठिकाणी सकाळी7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 26 मे  रोजी होणार आहे.

मालेगाव महापालिका निवडणुकीत ड्रोनचा वापर होणार !https://goo.gl/u9wjvN

COMMENTS