भिवंडी, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेसाठी उद्या मतदान

भिवंडी, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेसाठी उद्या मतदान

भिवंडी मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेसाठी  उद्या (दि.24) मतदान आहे, त्याच सोबत धारणी पंचायत समिती, नागभीड नगरपरिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीतच्या सर्वत्रिक तसेच विविध सात नगरपरिषदांतील 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी संपुर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत तिन्ही  मतदान केंद्रवर मतदान होणार आहे. 26 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तिन्ही महापालिकेच्या एकून 252 जागांसाठी 1 हजार 251 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

COMMENTS