मंत्र्याच्या ऑफिसमधून खंडणीसाठी फोन, ऑफिसमधील टायपिस्टला अटक !

मंत्र्याच्या ऑफिसमधून खंडणीसाठी फोन, ऑफिसमधील टायपिस्टला अटक !

मुंबई – पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या ऑफिसमधून 10 लाखा रुपयांच्या खंडणीसाठी फोन केल्याचं उघड झालंय. कदम यांच्या ऑफिसमधील टायपिस्ट महेश सावंत याला या प्रकरणी अटक करण्यात आलीय. मलबार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  विदर्भातील एका वाळू ठेकेदाराला महेश सावंत सातत्याने फोन करुन 10 लाख रुपये मागायचा. पैसे दे नाहीतर तुला मंत्र्यांना सांगून कारवाई करु अशी धमकी सावंतने दिली. त्यामुळे वैतागलेल्या वाळू ठेकेदाराने थेट मुंबई गाठत पर्यावर मंत्री रामदास कदम यांच्या पीएच्या कानावर हा प्रकार घातला. ठेकेदाराने काही पुरावेही त्यांच्याकडे सोपवले. मंत्राच्या पीएने हा सगळा प्रकार  पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कानावर घातला. त्यानंतर कदम यांनी स्वतःच याची तक्रार पोलिसात केली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत सावंत याला अटक केली. त्याचा फोन टॅपकरुन त्याचे संभाषणही रेकॉर्ड केले आहे. सावंत कुणाच्या सांगण्यावरुन हा उद्योग करत होता की स्वःताच करत होता याचा पोलीस तपास घेत आहेत.

COMMENTS