मते फुटीच्या बातम्यांवर काय म्हणाले काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ?

मते फुटीच्या बातम्यांवर काय म्हणाले काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ?

मुंबई – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची 6 ते 10 अशी मते फुटल्याची माहिती मिळतेय. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीची मते फुटल्याच्या बातमीचा इन्कार केला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी विखे पाटील यांच्याशी बोलून मते फुटली यावर प्रतिक्रिया देऊ असं सांगितलं आहे.

 

सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

आमची मते फुटली नाहीत. रमेश कदम यांना पक्षाने काढून टाकले आहे. त्यामुळे आमच्याकडे फक्त 40 मते होती. ती मते मीराकुमार यांना पडली आहेत.

 

अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

आमची मते फुटली का याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देऊ अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

COMMENTS