मनसेला शिवजयंती पडली भारी

मनसेला शिवजयंती पडली भारी

मनसेच्या वतीने दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर मनसेच्या वतीने यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त अमेय खोपकर यांनी शिवाजी पार्कात ढोलताशा पथक बोलवले होते. महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी होत असताना वंदन ढोल ताशा पथकाच्या 30 ढोलवादकांनी यावेळी ढोल वाजवले होते.

शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आवाज आणि ध्वनी प्रदूषण करण्यास बंदी आहे. तरीही नियमांचे उल्लंघन करुन अमेय खोपकर यांनी ढोलताशा पथक बोलवून ढोल वाजवल्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी मनसेला नोटीस बजावली आहे.

COMMENTS