ममता बॅनर्जी यांची ‘भाजप हटाव’ मोहीम

ममता बॅनर्जी यांची ‘भाजप हटाव’ मोहीम

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी “भाजप हटाव” ची मोहीमची घोषणा केली. 9 ऑगस्ट रोजी सुरू होणारे हे आंदोलन  30 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. 21 जूलै 1993 रोजी एका राजकीय आंदोलनावेळी पोलिसांच्या गोळीबारात पश्चिम बंगालमध्ये 13 पक्ष कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ ममता दरवर्षी ‘शहीद दिवस’ म्हणून आचरतात. यावेळी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.

केंद्रातील सरकार राज्य सरकारांना काम करू देत नसल्याचा आरोप करत, आम्ही त्यांचे नोकर नाही, असे त्यांनी सुनावले. भारतातून भाजपला हद्दपार करण्याच्या कार्यक्रमाला 9 ऑगस्टपासून सुरवात करण्यात येईल, अशी घोषणा करून तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधात 18 विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यात येईल आणि भविष्यात याची व्याप्ती वाढविली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर हिंदुत्ववादी पक्ष सत्तेवरून पायउतार होईल असा दावा ही त्यांनी यावेळी केला.

COMMENTS