मराठवाड्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

मराठवाड्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल

उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर तब्बल 10 वर्षानंतर राष्ट्रवादीचा भाजपाच्या मदतीने झेंडा..!

उस्मानाबाद –  अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेताजी पाटिल तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची निवड(आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी) भाजपा 4 सदस्यांनी ही  मतदानास उपस्थित न राहता राष्ट्रवादीला केली मदत  तर सेनेचे 2 गायब सदस्य ही उपस्थित राहिले नाहीत . सेनेची गटबाजीमुळे काँग्रेस आणि सेना आघाडीचा पराभव झाला.

 

नांदेड झेडपी निकाल  

नांदेड – जि.प. अध्यक्षपदी काँग्रेसचे शांताबाई जवळगावकर , उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव

शांताबाई जवळगावकर – (काँग्रेस)माजी आमदार माधवराव पाटील जवळगावरकर यांच्या मातोश्री

 

परभणी  झेडपी निकाल  

परभणी; जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपद बिनविरोध निवड, फक्त राष्ट्रवादीकडून दोन्ही पदासाठी एक एक अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला राठोड यांची अध्यक्षपदी तर भावना नखाते यांची उपाध्यक्षपदी वर्णी, 3 वाजता होणार अधिकृत घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस 54 पैकी 24 जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष.

 

बीड  झेडपी निकाल

अध्यक्ष –  सविता गोल्हार, भाजप

उपाध्यक्ष – जयश्री राजेंद्र मस्के, शिवसंग्राम

युती/आघाडी – भाजप, शिवसेना, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादीतून बंडखोर सुरेश धस एकत्र

 

जालना जिल्‍हा परिषद  निकाल  

अध्यक्षपदासाठी शिवसेना उमेदवार अनिरूध्द खोतकर यांना 34 तर भाजपचे अवधूत खडके यांना 22 मते, उपाध्यक्ष पदासाठी राष्‍ट्रवादीचे सतीश टोपे बिनविरोध, विजयाची घोषणा बाकी,  जालना जि.प. त सेना,  राष्‍ट्रवादी व काँग्रेस  एकत्र… संख्याबळ असूनही भाजपचा पराभव

अध्यक्ष – अनिरुद्ध खोतकर (शिवसेना) – राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंधू

उपाध्यक्ष – सतिष टोपे – माजी मंत्री राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचे बंधू

 

औरंगाबाद जिल्‍हा परिषद

अध्यक्ष –  देवयानी पाटील डोनगांवकर, शिवसेना

उपाध्यक्ष – केशवराव तायडे पाटील, काँग्रेस

युती/आघाडी – शिवसेना – काँग्रेस

अध्यक्ष – (शिवसेना) डोणगावकर – जिल्ह्यात मोठं प्रस्त असलेल्या डोणगावकर कुटुंबातील

 

लातूर जिल्हा परिषद

अध्यक्ष – मिलिंद लातुरे, भाजप

उपाध्यक्ष – रामचंद्र तिरुके

युती/आघाडी – भाजप स्वबळावर सत्ता स्थापन

 

हिंगोली जिल्हा परिषद

अध्यक्ष – शिवराणी  नरवाड, शिवसेना

उपाध्यक्ष – अनिल पतंगे

युती/आघाडी – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी

 

COMMENTS