मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यात 193 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यात 193 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

 26 दिवसात 76 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

नांदेड, बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या 

 

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सातत्याने सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणे वाढले असून तब्बल 193 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नांदेड आणि बीड जिल्ह्यात सवासधिक 36 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे म्हणजे मार्च महिन्यातील 26 दिवसांत तब्बल 76 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या पहिल्यास एका दिवसांत तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. यावर्षी चांगला पाऊस झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. एक नजर टाकूया मराठवाड्यातल्या शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवर..

 

(गेल्या तीन महिन्यातील आकडेवारी)

जिल्हा आत्महत्या

औरंगाबाद 25

जालना 21

परभणी 19

हिंगोली 13

नांदेड 36

बीड 36

लातूर 10

उस्मानाबाद 33

——————-

एकूण 193

 

COMMENTS