मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, धनंजय मुंडे यांची मागणी

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई – मराठवाड्यातील गेल्या 48 दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी पिके करपली आहेत तर काही ठिकाणी करपण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली.

दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झालाय. परभणी जिल्ह्यात वडिलांवर आत्महत्येची वेळ येऊ नये म्हणून 12 वीतल्या मुलीने आत्महत्या केली आहे. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर ही आत्महत्या झाली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीच्या काकांनी त्याच्याआधी 6 दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. त्याचा पंचनामा तरी करण्याची घोषणा करा अशी मागणीही मुंडे यांनी केली.

COMMENTS