मराठा आरक्षणासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना

मराठा आरक्षणासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना

मुंबईत 9 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चा काढण्यात आला होता. राज्यातील मराठा समाजातील बांधवांना आरक्षण मिळावे, यांसारख्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापन करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीमध्ये शिवसेनेकडून दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे, तर भाजपकडून संभाजी पाटील निलंगेकर आणि गिरीश महाजन आदीचा समावेश या समितीत आहे. मराठा समाजासाठी जाहीर केलेल्या विविध सवलतीच्या अंमलबजावणीबाबतही उपसमिती देखरेख ठेवणार आहे.

COMMENTS