महात्मा गांधींचा मारेकरी नथूराम गोडसेच्या जीवनावर सिनेमा

महात्मा गांधींचा मारेकरी नथूराम गोडसेच्या जीवनावर सिनेमा

महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या जीवनावर राम गोपाल वर्मा चित्रपट काढणार आहे. गोडसेच्या जीवनावर संपूर्ण संशोधन करुनच या चित्रपटाची पटकथा तयार केल्याचा रामूचा दावा आहे. 

मी गांधी आणि हिटलरच्या जीवनावर नाही तर नथुराम गोडसेच्या जीवनावर चित्रपट काढण्याच्या तयारीत आहे. महात्मा गांधींसारख्या एवढ्या लोकप्रिय नेत्याला गोडसेने का मारलं हे मला जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून मला त्याच्या जीवनावर आधारित सिनेमा करायचा आहे.

आजच्या जगात गांधीजींच्या विचारसरणीचा कोणीही माणूस नाही पण हिटलरच्या विचारसरणीचे अनेकजण असल्याचं राम गोपाल वर्मा सांगतो. गांधीजींची हत्या करताना नेमके कोणते विचार गोडसेच्या मनात घोळत होते? असं काय घडलं की, त्यानं गांधीजींची हत्या केली. या विचारांच्या मुळाशी जाऊन या गोष्टींचा छडा लावल्यानंतरच गोडसेंचं पात्र साकारायला मदत होणार आहे. मी गोडसेंवर पटकथाही लिहायला सुरुवात केली आहे, असं राम गोपाल वर्मानी म्हटलं आहे.

COMMENTS