महात्मा गांधीचे स्मारक चालते, मग बाळासाहेबांचे का नको? – सुभाष देसाई

महात्मा गांधीचे स्मारक चालते, मग बाळासाहेबांचे का नको? – सुभाष देसाई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला होणाऱ्या विरोधामुळे शिवसेना संतापली आहे. ‘कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना महात्मा गांधी यांची स्मारके होतात, मग बाळासाहेब ठाकरे यांचे का होऊ शकत नाही,’ असा सवाल शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.

मुंबईतील महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, या स्मारकासाठी महापौर निवासस्थान देण्याच्या व सरकारी तिजोरीतून त्यावर खर्च करण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

यावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बाळासाहेबांची तुलना थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी केली. ‘बाळासाहेब कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते, असा आक्षेप घेतला जातो. पण मग महात्मा गांधी कोणत्या घटनात्मक पदावर होते? तरीही अनेक सरकारांनी त्यांची स्मारकं बनवलीच ना? तेव्हा कुणी कधी आक्षेप घेतला नव्हता,’ याची आठवण देसाई यांनी दिली. अर्थात, गांधींजींच्या स्मारकाला आक्षेप घेणंही चुकीचं असल्याचं त्यांनी नमूद केलं

COMMENTS