महात्मा गांधी हल्ल्याचे साक्षीदार जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भिलारे गुरुजी यांचे निधन

महात्मा गांधी हल्ल्याचे साक्षीदार जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भिलारे गुरुजी यांचे निधन

सातारा जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी (वय 98) यांचे वृध्दापकाळाने भिलार (ता.महाबळेश्वर) येथे पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 1 वाजता भिलार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महात्मा गांधींचे पाचगणीत वास्तव्य असताना नथुराम गोडसेपासून गुरुजींनी त्यांचे प्राण धाडसाने वाचविले होते. महात्मा गांधी यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचे ते साक्षीदार होते. पांचगणीत महात्मा गांधी आले असता प्रार्थनेवेळी त्यांच्यावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नथुरामला पकडून भिलारे गुरुजींनी चोप दिला होता.

COMMENTS