महापौरांचा लाल दिवा परत द्यावा, खासदारांची मागणी

महापौरांचा लाल दिवा परत द्यावा, खासदारांची मागणी

औरंगाबाद – ‘महापौरांना आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार मिळायला हवे. महापालिका हे सर्वोच्च सभागृह आहे. त्यामुळे महापौर यांचे अधिकार वाढायला हवेत. तसेच महापौरांना लाल दिवा मिळावा, महापौर आले की नाही हे कळत नाही. त्यांच्या गाडी समोर पाटी लावावी लागते. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी लाल दिवा परत द्यावा.’ असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मागणी केली आहे.

औरंगाबाद शहरात 109व्या अखिल भारतीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय महापौर परिषदेला शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. ‘महापौरांना आर्थिक अधिकार मिळायला हवेत. तसेच दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि काही ठिकाणी आरक्षण मिळायला हवे.’ असे मत औरंगाबादचे महापौर भगवान घडामोडे यांनी सर्व महापौरांच्या वतीने यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री आणि उच्च पदस्थ अधिका-यांसाठी दिलेला लाल दिवा बंद करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

COMMENTS