माजी खासदार विश्वासराव (दाजी) पाटील यांचे निधन

माजी खासदार विश्वासराव (दाजी) पाटील यांचे निधन

सांगली –  माजी खासदार विश्वासराव रामराव पाटील (दाजी) यांचे आज सकाळी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांचे वय 83 वर्षे होते. येडेमच्छिंद्र येथे सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या आयुष्यातील 50 ते 60 वर्षे वाळवा तालुक्याच्या प्रगतीसाठी वेचले आहेत. पाटील हे जनता दलाच्याकडून राज्यसभेवर खासदार होते. त्यांनी सांगली लोकसभेची दोन वेळा निवडणूक ही लढवली होती. चंद्रशेखर पंतप्रधान असताना, पाटील हे जनता दलाचे प्रभावी नेते म्हणून कार्यरत होते. लोकनेते राजारामबापू पाटील यांचे निकटचे सहकारी म्हणून ते परिचित होते. जनता पक्षाच्या माध्यमातून इस्लामपूर तहसीलदार कचेरीवर भव्य मोर्चा नेण्यात आला होता. या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले होते.

COMMENTS