शेतकरी बांधवांनो कामाला लागा, मान्सून वेशीवर आला !

शेतकरी बांधवांनो कामाला लागा, मान्सून वेशीवर आला !

दरवर्षी 18 मेच्या सुमारास अंदमानमध्ये दाखल होणारा मान्सून यावर्षी 4 दिवस आधीच दाखल झाला आहे. मान्सून पुढे जाण्यासही अनकूल वातावारण आहे. ते असेच कायम राहिल्यास देशाच्या इतर भागात आणि राज्यातही मान्सून वेळेपेक्षा आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या ७२ तासात बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग, निकोबार बेटे आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यापुर्वी हवामान विभागाने अगोदर 15 मेला मान्सून अंदमानला येईल असे जाहीर केले होते. गेल्या महिन्यात मान्सूनचा प्राथमिक अंदाज व्यक्त करताना हवामान विभागाने यंदा मान्सून ९६ टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़.

COMMENTS