मालेगावात 24 तासामध्ये दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मालेगावात 24 तासामध्ये दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोवीस तासात मालेगाव तालुक्यातील दोन तरूण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचे मालेगाव तालुक्यात आगमन होण्याच्या कालावधीत या दोन्ही घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनोज शांताराम सावंत (वय 25, रा. वाके) आणि राकेश प्रकाश शेवाळे (वय 24, रा. निंबायती) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मनोज यांनी रविवारी सायंकाळी शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्याकडे पावणेदोन एकर शेतजमीन आहे. सौंदाणे येथील महाराष्ट्र बँक शाखेकडून त्यांनी 80 हजाराचे कर्ज घेतले होते. सतत तीन वर्षे पडलेल्या दुष्काळामुळे शेतीतून उत्पादन मिळू शकले नाही. त्यामुळे निराश झालेल्या मनोज यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेमध्ये निंबायती येथील राकेश शेवाळे यांनी सोमवारी सकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन भावंडे असलेल्या राकेश यांच्या कुटुंबियांकडे पाच एकर शेतजमीन आहे. या जमिनीवर स्थानिक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडून घेतलेले 60 हजारांचे कर्ज थकीत आहे.

COMMENTS