माल वाहतूकदारांचा देशव्यापी चक्काजाम आंदोलन मागे

माल वाहतूकदारांचा देशव्यापी चक्काजाम आंदोलन मागे

राज्यातील माल वाहतूकदार आज (शनिवारी) मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने केलेल्या परिवहन शुल्कातील वाढीपाठोपाठ केंद्र सरकारने वाहतूकदारांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये सुमारे 50 टक्के वाढ केली. तसेच टोलवसुली मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. याच्या विरोध करण्यासाठी हा संप पुकारल्याचे माल वाहतूक संघटनेने स्पष्ट केले होते. मात्र, थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये आता 27 टक्केच वाढ करण्यात येईल, असे स्पष्ट केल्यानंतर आज मध्यरात्रीपासूनचा संप मागे घेतला आहे.

 

COMMENTS