माहिकोचे संस्थापक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन

माहिकोचे संस्थापक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन

महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनीचे संस्थापक डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे आज मुंबईत निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत बारवाले यांच्यावर रात्री 8.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बारवाले यांनी महिकोच्या माध्यमातून भरपूर उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत कृषी क्रांती घडवून आणली.अनेक बियाणांचा शोध लावल्यानंतर त्याचे देशभर वितरण, ते साठवण्याची सुविधा अशा पूरक व्यवसायांचाही विस्तार झाला. त्यातून कृषी क्षेत्रात क्रांती झाली. त्याच्या या कामगिरीबद्दल 2001 साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्काराने सन्मान केला होता. 1998 साली त्यांना वर्ल्ड फूड प्राईज फाऊंडेशन अमेरीका यांच्याकडून ‘वर्ल्ड फूड प्राईज’ या किताबाने गौरवण्यात आले होते.

COMMENTS