“मुंबईतील चेंगराचेंगरीत 23 बळी गेले त्या दिवशी किरीट सोमय्या दांडिया खेळण्यात दंग”

“मुंबईतील चेंगराचेंगरीत 23 बळी गेले त्या दिवशी किरीट सोमय्या दांडिया खेळण्यात दंग”

मुंबई –  मुंबईत शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमार एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगरा चेंगरीमध्ये 23 जणांचे बळी गेले. या दुर्दैवी घटनेमुळे मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले. सध्या नवारात्र असतानाही अनेक ठिकाणचे दांडियाही रद्द करण्यात आले. मात्र भाजप खासदार किरीट सोमय्या हे त्याच दिवशी रात्री दांडिया खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. विविध राजकीय नेत्यांनी यावरुन सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही सोमय्या यांचा दांडिया खेळतानाचा फोटो ट्विट केला आहे. तसंच सोमय्या दांडिया खेळतानाचा व्हिडिओही ट्विट केला आहे. आम्ही या फोटो किंवा व्हिडिओची सत्यता पडताळली नाही. मात्र सोमय्यांनी अजूनतरी याचा इन्कार केलेला नाही.

COMMENTS