मुंबईत निवडणुकीसाठी 50 हजार कोटी खर्च केले, मग शेतक-यांसाठीच पैसे का नाहीत ? – संजय राऊत

मुंबईत निवडणुकीसाठी 50 हजार कोटी खर्च केले, मग शेतक-यांसाठीच पैसे का नाहीत ? – संजय राऊत

दिल्ली – उत्तर प्रदेश सरकारने शेतक-यांसाठी कर्जमाफी दिल्यानंतर महाराष्ट्र कर्जमाफीवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलंय. विरोधकांसोबत आता मित्र पक्ष शिवसेनेनंही थेटपणे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. भाजपचे पैशांचे सगळे व्यवहार सुरळीत सुरू आहेत, आमदार फोडाफोडीसाठी तुमच्याकडे पैसे आहेत, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तुम्ही 50 हजार कोटी रुपये खर्च केलेत, मग शेतक-यांचे कर्जमाफ करण्यासच तुमच्याकडे पैसे कसे नाहीत असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.

कर्जमाफी देणे ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे त्यांनी केंद्राकडे बोट दाखवू नये असा इशाराही राऊत यांनी दिलाय. मोदींचे तुम्ही लाडके मुख्यमंत्री आहात मग त्यांच्याकडूनही मदत आणा असंही राऊत म्हणाले. गेल्या 8 दिवससांत राज्यात 30 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत असंही राऊत म्हणाले. उत्तर प्रदेशात योगींनी कर्जमाफी दिली आहे. आम्ही त्यांचे अभिनंद केले आहे. कर्जमाफी देण्यासाठी मोठं मन लागतं असा टोलाही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगवला. बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन अशा एकामागून एक घोषणा करत आहेत, मग शेतक-यांच्या बाबतीच तुम्हाला पाझर का फुटत नाही ? असा सवालही राऊत यांनी केलाय.

COMMENTS