मुंबईत वरुणराजाची हजेरी

मुंबईत वरुणराजाची हजेरी

उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आज मध्यरात्रीच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला.मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई परिसरात वादळ व विजेंच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसाने हजेरी लावल्याने हैराण मुंबईकर सुखावले आहेत. रात्री सव्वासात वाजता नेरूळ, खारघर, पनवेल या पट्ट्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. सायन परिसरातही पाऊस झाला.  
मुंबईतील पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, मुलुंडसह भांडुप येथे व अंधेरी, वडाळा, दादर आणि अ‍ॅन्टॉप हिल येथेही वरूणराजाच्या हजेरीने मुंबईकर सुखावला आहे. घाटकोपर परिसरात झालेल्या पावसावेळी तांत्रिक खोळंब्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक काहीकाळ रखडली होती. थोड्याच वेळात ती पूर्ववतही झाली. घाटकोपर, मुलुंड आणि भांडुप येथे पडलेल्या हलक्या पावसांच्या सरींमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता.

COMMENTS