मुंबईत शिवसेनेला धक्का, एक विद्यमान आमदार भाजपच्या गळाला ?

मुंबईत शिवसेनेला धक्का, एक विद्यमान आमदार भाजपच्या गळाला ?

मुंबई – मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार राजहंस सिंह यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला असताना आता आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय. हा आमदार भाजपचाच मित्र पक्ष असलेल्या शिवसेनचा आहे. मुंबईच्या अणुशक्तीनगरचे शिवसेना आमदार तुकाराम काते हे भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय.

तुकाराम काते यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी काल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी काते यांनी त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पोस्टर लावली होती. मात्र त्या पोस्टरवर कुठेही शिवसेनच्या नेत्यांचे फोटो नव्हते. तसंच महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये उडी मारलेले बबलू चौधरीही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे ते भाजपच्या गळाला लागल्याचं बोलंलं जातंय.

याबाबत काते यांना पत्रकारांनी छेडलं असता आपण शिवसेनेत नाराज आहोत अशी कबुली दिली. मात्र आपण शिवसेना सोडणार नाही असंही ते सांगायला विसरले नाहीत. काते यांच्या मतदारसंघातील पुर्नविकासाची कामे करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्याचीही चर्चा आहे. तसंच काते याचं शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याशी पटत नाही. त्यामुळे ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये उडी मारणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS