मुख्यमंत्री आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, परिसरात तणाव, करमाळ्यात कडकडीत बंद

मुख्यमंत्री आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, परिसरात तणाव, करमाळ्यात कडकडीत बंद

सोलापूर – करमाळा तालुक्यातील कर्जबाजारी शेतकरी धनाजी जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास गावक-यांनी नकार दिलाय. मुख्यमंत्री गावात आल्याशिवाय आणि कर्जमाफीचं आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका गावक-यांनी घेतली आहे. त्यामुळे वीट गावासह तालुक्यात तणावाचं वातावरण आहे.  जाधव यांच्या आत्महत्येनंतर शेतक-यांमध्ये संतापाची लाट असून करमाळा बंदची हाक देण्यात आली आहे. बंदला उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. काल रात्री धनाजी जाघव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत माझ्या मृतदेहाला अग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केलीय. धनाजी जाधव यांना अडीच एकर कोरडवाहू जमीन असून त्यांच्यावर स्टेट बँक,,सोसायटीच लाखो रुपये कर्ज आहे. घरातील थोरला व्यक्ती असल्याने सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. आई,वडील, लहान भाऊ, पत्नी, आणि 2 मुले अस त्यांचं कुटुंब आहे. मात्र शेतीतील सततच्या नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी मित्रांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून त्यात मुख्यमंत्री आल्याशिवाय आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे कर्ज  माफ झाल्याशिवाय मला जाळू नका,अशी विनंती केली आहे.  कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले असताना वीटमध्ये धनाजी चंद्रकांत जाधव यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

COMMENTS