मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम कुंडात केले गणपतीचे विसर्जन

मुख्यमंत्र्यांनी कृत्रिम कुंडात केले गणपतीचे विसर्जन

मुंबई – संपूर्ण देशभरात भाविकांच्या लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या ‘वर्षा’ या निवासस्थानी प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्तीचे कृत्रिम कुंडात विसर्जन केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी इकोफ्रेंडली शाडूच्या गणेशमूर्तीची स्थापना केली होती. ही मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्याने जलप्रदूषणही होत नाही. मुख्यमंत्र्यांनी गणेशमूर्तीचे निवासस्थानाजवळील कृत्रिम कुंडात विसर्जन केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती.

COMMENTS