मोदींना ‘पायउतार’ होण्याची विंनती, आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ!

मोदींना ‘पायउतार’ होण्याची विंनती, आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना कार्यक्रमाचं निवेदन करणा-याने पायउतार होण्यास सांगितलं आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी आज (शनिवारी) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही देशातील परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत करार करण्यात आले. तस पाहायला गेलं तर दोन देशांच्या प्रमुखांची संयुक्त पत्रकार परिषद असते त्यावेळी वातावरण अतिशय गंभीर असते. परंतु निवेदकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

 

तर झालं असं की, नेत्यांची भाषणं जेव्हा संपली तेव्हा निवेदन करणारा अधिकारी म्हणाला की, ‘आय रिक्वेस्ट टू प्राइम मिनिस्टर्स टू स्टेप डाऊन’, असे निवेदकाने म्हणताच सभागृहात सर्व हसू लागले. ‘स्टेप डाऊन’ या शब्दाचा अर्थ पद सोडणे किंवा पायउतार होणे असा आहे. निवेदकाला म्हणायचं होतं की दोन्ही नेत्यांनी मंचावरुन खाली उतरावं. त्याच उद्देशाने त्याने तसे म्हटले होते परंतु त्याचा अर्थ वेगळा निघत असल्याने सभागृहात हशा पिकला. मोदी आणि हसीना हे देखील या छोट्याशा विनोदावरुन खळखळून हसले.

COMMENTS