मोदींसमोर शॉर्ट ड्रेस घालून बसल्याने प्रियांकावर नेटिझन्सचे टिकास्त्र, प्रियांकाचे ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर

मोदींसमोर शॉर्ट ड्रेस घालून बसल्याने प्रियांकावर नेटिझन्सचे टिकास्त्र, प्रियांकाचे ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जर्मनीच्या दौ-यावर आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा तिच्या आगामी ‘बेवॉच’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने बर्लिनमध्ये आहे. मोदी आणि प्रियांका हे येथे एकाच हॉटेलमध्ये थांबलेले होते. योगायोगाने काल (दि. 30) त्यांची भेट झाली. यावेळी प्रियांकाने व्हाइट कलरचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. प्रियांकाने मोदी भेटीची काही छायाचित्रे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. हे फोटोज समोर आल्यानंतर नेटिझन्सनी प्रियांकावर तिच्या शॉर्ट ड्रेसवरुन टीका करायला सुरुवात केली. ड्रेसवरुन तिची खिल्ली उडवण्यात आली.  मात्र, प्रियांकाने त्यांना चांगलचं प्रतीउत्तर दिलं असून आणखी एक फोटो शेअर करुन टीकाकारांना चोख उत्तर दिले.

प्रियांकाने मोदींची भेट घेताना पांढ-या रंगाचा वनपीस घातला होता. मात्र, हाच तिचा ड्रेन अनेकांना खटकला. ‘प्रियांक तू देशाच्या पंतप्रधानांसमोर बसली होतीस तेव्हा कसे कपडे घालायचे याचे तुला तारतम्य असले पाहिजे’. ‘पंतप्रधानांना भेटताना तुम्ही पाय झाकायला हवे होते. भारतीय संस्कृतीची थट्टा उडवायला नको होती’, ‘ तुम्ही पंतप्रधानांचा आदर राखायला हवा होता, त्यांच्यासमोर पाय दाखवणं योग्य नाही’ असे अनेक मेसेज करत लोकांनी तिच्यावर टीका केली. मात्र या टीकेमुळे प्रियांकाला काडीमात्रही फरक पडला नाही.  उलट  प्रियांकाने तिच्या आईसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअरकरुन उत्तर दिले आहे. या फोटोमध्ये प्रियांका आणि तिची आई दोघीही शॉर्ट ड्रेसमध्ये आहेत. आईसोबतचा शॉर्ट ड्रेसमधला फोटो पोस्ट करत ‘ Legs for days’ अशी कॅप्शनही टाकली.

‘बर्लिनमध्ये मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असण्याचा सुंदर योगायोग जुळून आला. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मला आज सकाळी भेटल्याबद्दल तुमचे खूप आभार’, असे ट्विट अभिनेत्री प्रियांका चोप्राने या भेटीनंतर केले होते.

पंतप्रधान मोदी सध्या चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. 29 मे रोजी मोदी जर्मनीमध्ये दाखल झाले होते. मोदींनी तिथे जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची भेट घेतली. मर्केल यांच्याबरोबर विविध मुद्यांवर समाधानकारक चर्चा झाल्याचे मोदींनी टि्वट करुन सांगितले होते.

 

COMMENTS