विरोध झुगारून अखेर मोहन भागवतांनी शाळेत झेंडावंदन केलेच !

विरोध झुगारून अखेर मोहन भागवतांनी शाळेत झेंडावंदन केलेच !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना आज केरळमध्ये झेंडावंदन करण्यापासून रोखण्यात आले. मोहन भागवत हे केरळमधील एका शाळेत झेंडावंदन करणार होते. मात्र जिल्हाधिका-यांनी त्यांना मनाई केली. एखाद्या सरकारी शाळेत कोणताही राजकीय किंवा इतर व्यक्ती झेंडावंदन करु शकत नाहीत. केवळ शाळेतील शिक्षक किंवा लोकप्रतिनिधीच सराकरी शाळेमध्ये झेंडावंदन करु शकतात असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. तशा सूचना शाळा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यामुळे मोहन भागवत यांना झेंडावंदन करता आले नाही. एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. या प्रकारामुळे काही काळ भाजप कार्यकर्ते आणि प्रशासनामध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाचा विरिोध झुगारुन अखेर मोहन भागवतांनी अखेर झेंडावंदन केलेच.

COMMENTS