यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही – सुरेश जैन

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही – सुरेश जैन

जळगाव – यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं माजी मंत्री सुरेश जैन यांनी स्पष्ट केलंय. या स्पष्टीकरणामुळे जैन यांच्या राजकीय पुनरागमनाच्या चर्चेला पुर्णविराम मिळालाय. जळगावमध्ये एका कार्यक्रमात जैन बोलत होते. कार्यक्रमात विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना उद्देशून बोलताना त्यांना आता तुम्हाला माझी भिती नाही कारण मी यापुढे कुठलीही निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट केलं. 9 वेळा मी आमदार झालो आहे. त्यामुळे यापुढे निवडणूक लढवणार नाही असं ते म्हणाले. सुरेश जैन यांना १० मार्च २०१२ रोजी २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळा प्रकरणी अटक झाली होती. साडेचार वर्षे धुळे मध्यवर्ती कारागृहात होते. नगर पालिका,  जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत जैन सामील झाले होते, पण तेव्हा त्यांनी राजकीय वक्तव्य करणे नेहमीच टाळले, आज प्रथमच जैन यांनी एका जाहीर कार्यक्रमात राजकीय निवृत्तीची घोषणा करुन खळबळ माजविली. जैन सध्या जामिनावर बाहेर आहेत. ,घरकुल खटला सध्या धुळे विशेष न्यायालयात सुरु आहे.

COMMENTS