मायावतींच्या राजीनामा खेळीनंतर विरोधांमध्ये एकी ?

मायावतींच्या राजीनामा खेळीनंतर विरोधांमध्ये एकी ?

दलितांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावर आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नाही, असे सांगत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. मायावती यांच्या राजीनाम्यामुळे अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मायावतींनी मोठ्या विचारपूर्वक केलेली ही कृती असून पुढील वाटचालीसाठी त्यांनी खेळलेला हा राजकीय डाव असल्याचे बोलले जाते.  उत्तर प्रदेशमधील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केशवप्रसाद मौर्य हे फुलपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. परंतु, त्यांचा उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून राज्याचे ते उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून यावे लागणार आहे. त्यामुळे फुलपूर लोकसभा मतदारसंघातून मायावती निवडणुकीसाठी उभ्या राहू शकतात. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

फुलपूर मतदारसंघात दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय मतदारांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे मायावती या मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात. बसपसाठी ही जागा खूप महत्वाची आहे. जर त्यांनी येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर महाआघाडीच्या त्या संयुक्त उमेदवार राहू शकतात. बसप, सप आणि काँग्रेस ही पोटनिवडणूक एकत्रित लढू शकतात. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीची ही तयारी मानली जाते. जर फुलपूरमधून मायावती यांनी विजय मिळवला तर त्यांच्यासाठी हे मोठे यश असेल. कारण बसपची राज्यातील ताकद मोठ्याप्रमाणात घटली आहे.

 

 

COMMENTS