या अभिनेत्याने विकत घेतला ‘किंगफिशर व्हिला’

या अभिनेत्याने विकत घेतला ‘किंगफिशर व्हिला’

17 बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्य सम्राट विजय मल्ल्या याचा गोव्यातील आलिशान किंगफिशर व्हिला विकण्यात आला आहे. तेलुगू अभिनेता, प्रसिद्ध उद्योगपती सचिन जोशी यांनी तब्बल  73.01 कोटी किंमतीला किंगफिशर व्हिला विकत घेतला आहे.
32 वर्षीय सचिन जोशी  हे विकिंग मीडिया आणि एंटरटेनमेंटचा मालक आहे.आझान, मुंबई मिरर आणि जॅकपॉट सारख्या हिंदी सिनेमांना सचिन जोशीच्या विकिंग मीडियाने निर्मिती केली आहे. ऐश्वर्या राय बच्चनने कमबॅक केलेल्या जझबा या सिनेमाची निर्मिती देखील विकिंग मीडियाने केली होती. सचिन जोशी हा तेलगु सिनेमातील अभिनेता आहे. जोशी JMJ ग्रुपचा चेअरमन आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बँकेकडून मल्ल्याचा व्हिला विकण्यासाठी लिलाव सुरु होता. मात्र हा शानदार बंगला विकत घेण्यासाठी कोणीही खरेदीदार पुढे येत नव्हता. अखेर अभिनेता सचिन जोशीनं यांनी हा व्हिला विकत घेण्याची तयारी दर्शवली.

 

COMMENTS