राजू शेट्टींच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवाच, सदाभाऊंना थेट आव्हान !

राजू शेट्टींच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवाच, सदाभाऊंना थेट आव्हान !

सांगली – काही दिवसांपूर्वी राजू शेट्टींच्या बालेकिल्ल्यात जाऊन मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजु शेट्टी विरोधकांना एकत्र करत राजू शेट्टींवर हल्लाबोल केला होता. त्याला आज राजू शेट्टी आणि समर्थकांनी सदाभाऊंच्या सांगलीत जाऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं. दम असेल तर मंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखखावी असं आव्हान सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सजाजी मोरे यांनी दिलं.

आमच्या चळवळीत काम करणारे स्वतः हून सभेसाठी मोठया संख्येने येतात. इतरांसारखे गाड्या पाठवून, पैसे देऊन गर्दी जमवावी लागत नाही या शब्दात राजु शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या समाचार घेतला.  शेतकऱ्याच्या मालाची आणि मागण्यांची यादी गड्याला दिली, वाटलं शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करेल, पण काय सांगू गडी यादी घेऊन *कायमचाच गेला, आणि दुसऱ्या घरात जाऊन राहिला. आणि आमच्या घरातील लोकांना पैशाच आमिष दाखवून तिकडे बोलवत आहे, पण गड्याने लक्षात ठेवावे, एक दिवाळी झाली परत गड्याच काय ? जमवले पैसे सम्पल्यावर गड्याच काय ?  अशा शब्दात राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली.

COMMENTS