राजू शेट्टींना अशोक चव्हाणांचा फोन !

राजू शेट्टींना अशोक चव्हाणांचा फोन !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा सध्या नवी मुंबईत आहे. पुण्यातून थेट मुंबईपर्यंत पायी चालल्यामुळे खासदार राजू शेट्टी यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांच्या पायाला फोड आले असून पायाला सूजही आली आहे. तसंच त्यांचा रक्तदाबही कमी झाला आहे. हे समजतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शेट्टी यांना फोन करुन त्यांच्या प्रकृती विचारपूस केली. तसंच दोन दिवसात मुंबईत यात्रा पोहचल्यानंतर भेट घेण्याचं आश्वासनही शेट्टी यांनी चव्हाण यांना दिलंय. भाजप सरकारविरोधात निघालेल्या या आत्मक्लेश यात्रेला विरोकांचंही चांगलंच बळ मिळताना दिसंतय. भाजप आणि सदाभाऊ खोत यांच्यावर प्रचंड नाराज असलेल्या शेट्टी यांना शिवसेने नंतर आता काँग्रेसनंही साथ देण्याचं ठरवल्याची चर्चा आहे.

COMMENTS