राज्यभरात शेतकरी संपाला उत्सफुर्त प्रतिसाद, दिवसभरातील घडामोडी पाहा एका क्लिकवर…

राज्यभरात शेतकरी संपाला उत्सफुर्त प्रतिसाद, दिवसभरातील घडामोडी पाहा एका क्लिकवर…

विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शेतक-यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आज सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा आहे. मनमाड, नांदगांव ,मालेगाव,कळवण, सटाना ,देवाळा  बाजार समिती व्यवहार ठप्प आहे.  नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी व् सटाना  तालुक्यातील  नामपुर येथील आठवड़े बाजार शेतकऱ्यांनी स्वयंसफुर्तिने बंद ठेवले … व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभाग, बाजारात शुकशुकाट…

माजी आमदार शंकरराव गडाख यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आज शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर  नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे  रास्ता रोको आंदोलनादरम्यान माजी आमदार शंकरराव गडाख यांना पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.  गडाख यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी गडाखांसह 150 कार्यकर्त्यांना ताब्यात  घेतले. गडाखांच्या अटकेच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्याला सुमारे 1000  शेतकऱ्याचा घेराव घातला.

नाशिक : महाराष्ट्र बंदला उत्‍स्‍फुर्त पाठिंबा, सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचं मुंडन

नाशिक: शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला नाशिक जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गिरणारे गावातून शांतपणे निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारच्या निषेधार्थ गावातील शेतकऱ्यांनी  मुंडन करून निषेध केला. तसेच बैलगाडीच्या माध्यमातून अनोख्या स्वरूपात रास्ता रोको करण्यात आला..

उस्मानाबाद – शेतकरी बंदला जिल्ह्यात हिंसक वळण

उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी बंदला हिंसक वळण लागलं आहे. कळंब तालुक्यात तीन बसेस संतप्त शेतक-यांनी फोडल्या आहेत. त्यामध्ये मोहा गावात 2 बसेसवर दगडफेक झाली तर मस्सा गावात 1 बस फोडली.  एम एच 14 बी 3262 ही कुर्डवाडी – माजलगाव ही गाडी मस्सा (ख) येथे येथे गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.  तर एम एच 20  बी एल 788 ही कळंब बार्शी ही गाडी मोहा गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे व या मध्ये पुढील काचा फुटल्या आहेत.  तर एम एच 14 डी 8358 येडशी – कळंब ही गाडी मोहा गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे व या मध्ये पुढील काचा फुटल्या आहेत.

नाशिकच्या बाजारसमितीत शुकशुकाट

आज शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बाजारसमितीत  शुकशुकाट असून जिल्ह्यातील पंधरा बाजारसमित्यांत सर्व शेतमाल व्यवहार ठप्प आहे. दररोज पन्नास कोटी रुपयांची उलाढाल होणा-या बाजारसमितीत आज व्यवहार पुर्ण पणे ठप्प झाला आहे. पस्तीस हजार क्विंटल कांदा खरेदी व्यवहार बंद असून पिंपळगाव लासलगावातील सर्व आर्थिक व्यवहार दुकाने, व्यवसाय बंद आहे.

लातूर –  शेतकऱ्यांच्या बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद, औसा येथे संतप्त शेतकऱ्यांनी शासकीय दूध योजनेचा दुधाचा टँकर रस्त्यावर खुला केला, हजारो लिटर दूध वाया.

अमरावती – अमरावती नागपूर महामार्गावर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला असून या आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतूक व्यवस्था खोळंबली होती आंदोलकांनी रस्त्यावर  टायर पेटवून वाहतूक बंद पाडली  अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात आजच्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला मात्र शहरात या आंदोलनाचा परिणाम दिसून आला नाही

सातारा – शेतक-यांनी पुकारलेल्या बंदला साता-यात व्यापा-यांनी चांगलाच प्रतिसाद दिला असुन कराडमध्ये सर्व पक्षीय मोर्चा काढुन बाजारपेठा बंद करण्याच आवाहन करण्यात येत होत.
अकोला – मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम गावात शेतकरी उतरले रस्त्यावर दूध ,भाजीपाला फेकला रस्त्यावर ,काही वेळासाठी राष्ट्रीय महामार्ग बंद केला,शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जालना – जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी कड़कड़ीत बंद, रोहिलागड़ येथे कड़कड़ीत बंद पाळुन मुख्यमंत्र्यांच्या पुतऴ्याची अंत्ययात्रा काढली

उस्मानाबाद- स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे तुळजापुर पोलिसांच्या ताब्यात

नांदेड – जिल्ह्यात  बंदला चांगला प्रतिसाद,  सर्व तालुक्यांमध्ये बंद,  माहुरचा आठवडी बाजार बंद,  शहरातील छत्रपती चौकात रास्ता रोको, उमरी तालुक्यात सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध

सोलापूर सह जिल्ह्यातील 12 बाजार समिती चा कारभार ठप्प

औरंगबाद : शहरी भागात बंद ला समिश्र प्रतिसाद, ग्रामीण भाग 90 टक्के बंद, अनेक गावचे बाजार बंद,

कोल्हापूर शिवसैनिकांनी NH ४ रोखला.. पुणे बेंगलोर रोड वरील वाहतूक खोळंबली..

नाशिक कळवण  येथे  रास्ता आंदोलन सुरू कळवण  शहर  सह  तालुका  कडकडीत  बंद

सांगली  – शेतकरी आंदोलना साठी सांगली बंद आंदोलन : सर्व पक्षीय मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली : शासनाकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप : मोर्चा काढणारच असल्याचा सर्व पक्षीय नेत्यांची भूमिका :

औरंगाबाद – आहवा राज्यमार्गावर  अंबासन फाट्यावर  संतप्त शेतकऱ्यांनी सुरु केला रास्ता रोको

चांदवड येथे आठवडे बाजार असूनही कडकडीत बंद , लासलगाव शहर बाजार समिती सह बंद .

निफाड येथे बंदला संमिश्र प्रतिसाद अहमदनगर जिल्ह्यात ग्रामिण भागात  बंदची  तीव्रता  अधिक … अकोले,संगमनेर. राहाता श्रीरामपुर तालुक्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद

पुणे – नाशिक महामार्गावर आंबीखालसा-फाटा येथे आंदोलन सुरू आंदोलक झोपले महामार्गावर

अहमदनगर –  जिल्ह्यात राज्यव्यापी बंदला चांगला प्रतिसाद… नगर शहरासह पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात कडकडीत बंद…

कर्जत मधील सोमवारचा आठवडे बाजार देखील बंद…

हिंगोली जिल्हाभरात आज बंद,हिंगोली, कळमनुरी,वसमत, सेनगाव येथील बाजार समित्या बंद,भाज्यांची सर्व मार्केट आज कडकडीत बंद,

कळमनुरी नांदेड महामार्गावरील कामठा फाटा येथे रास्तारोको

कोपरगाव शहरात कडकडीत बंद … कोपरगाव मधील सोमवारचा आठवडे बाजार देखील बंद…

नंदुरबार  – बंदच्या पार्शवभूमी वर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बंदला शहरी भागात संमिश्र बाजार समित्यामधील आवक मांदवली जिल्ह्यातील बंदाची तीव्रता 11 वाजे नंतर बंदाची तीव्रता वाढेल

नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे आठवड़े बाजार ठेवून काढली  सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

सटाना तालुक्यात बंदला उत्स्फूर्त  प्रतिसाद ..नामपुर आठवड़े  बाजार बंद औरंगाबाद -आहवा राज्यमार्गावर  अंबासन फाट्यावर  संतप्त शेतकऱ्यांनी  रास्ता रोको आंदोलन करून  केले मुख्यमंत्र्यांच्या  पुतळ्याचे  दहन …

अहमदनगर – श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे सर्व शेतकरी आणि व्यापारी वर्गाने बंद पाळून सरकारचा केला निषेध… सरकारच्या निषेधार्थ हरिनाम गजर करत सरकारची अंत्ययात्रा काढली…

कर्जत तालुक्यीतील बाबुळगाव खालसा येथे आणि जामखेड तालुक्यातील खर्डा चौक येथे शेतकर्यानी रस्त्यावर उतरत केले रास्तारोको आंदोलन…

सोलापूर जिल्हयातील सर्व बाजार समित्या बंद, पोलीस तैनात,

सातारा जिल्ह्यातील सर्व 13 शेती उत्पन्न. समिती आज बंद – साताराहुन पुणे कडे जाणारा भाजीपाला रोखला –

अहमदनगर – नगर तालुक्यातील वांबोरी येथे शेतकर्यांनी गाव आणि बाजारपेठ बंद ठेवून राज्यव्यापी संपला दिला पाठींबा. रस्त्यावर कांदा आणि दूध ओतून सरकारचा केला निषेध…

औरंगाबाद बाजार समिती बंद,  सकाळी सुरु झाली होती, मात्र आता काही शेतकरी आणि मराठा संघटनानी बंद पडले

पुणे- नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी अडवल्या माल वाहतुकीच्या गाड्या रस्त्याच्या दूतर्फ गाड्यांच्या  लागल्या रंगा

यवतमाळ –  नागपूर तुळजापूर राज्य मार्गावर चक्काजाम.. शेतकऱ्यांचे आंदोलन .. तुराटी व पर्हाटी पेटवून रोखला रस्ता.वाहतूक ठप्प.

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून हिंगोलीसह वसमत कळमनुरी औंढा नागनाथ सेनगाव,जवळा बाजार,आखाडा बाळापूर येथील भाजी मार्केट मध्ये कडकडीत बंद, हिंगोली मध्ये काही बागवानांनी भाज्या आणल्या होत्या तेथील भाजा आंदोलकांनी रस्त्यावर फेकून देऊन आंदोलन केल, बालसोंड येथे रास्ता रोको करून एकास दुधाने आंघोळ घातली. तर कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथे ही शेतकर्यांनी हिंगोली नांदेड राज्यमहामार्ग अडवून भल्या पहाटे पासून दोन तास रस्ता अडवण्यात आला होता. कळमनुरी येथील बाजार पेठेत ही आज भाजीपाला आलाच नाही,वसमत येथे तर शेकडो शेतकऱ्यांनी व्यापार्यानी बैठक घेऊन शहर बंद ठेवण्याच कालच जाहीर केलं होत,यात विरोधी पक्षाचे नेतेआणि कार्यकर्ते ही सहभागी झाले होते.

रत्नागिरी – शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये शिवसेना आक्रमक.. लांज्यातील बाजारपेठ शिवसैनिकांनी जबरदस्तीने बंद.. राजापूरचे आमदार राजन साळवी यांचा पुढाकार आमदार उतरले रस्त्यावर, शिवसैनिकांसोबत केली बाजारपेठ बंद …शिवसेनेने बंदला दिलाय पाठिंबा, लांजा पाठोपाठ राजापूर बाजारपेठ बंद करणार

सांगली – अमनापूर आणि मनेराजुरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन तर मनेराजुरी येथे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुतळा जाळला, दूध रस्त्यावर ओतलं,  संपूर्ण गाव बंद

नंदुरबार – शिवसेनेच्या वतीने धुळे नंदुरबार रोडवर रनाळे गावाजवळ दोन तासापासून रस्ता रोको आंदोलन सुरू वाहनांच्या मोठ्या रांगा… नावपूर तालुक्यात कडकडीट बंद सर्वव्यापरी प्रतिष्ठाने बंद शहर सह तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त अनेकांना पोलिसांनी दिल्या crpc 149 प्रमाणे नोटिसा…

COMMENTS