राज्यात काय झाले स्वस्त आणि काय झाले महाग

राज्यात काय झाले स्वस्त आणि काय झाले महाग

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा 2017-18 चा अर्थसंकल्प सादर केला. मात्र अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना, विरोधकांनी सुरु केलेला गदारोळ, शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला. त्यामुळे या गदारोळातच मुनगंटीवारांनी अर्थसंकल्प सादर केला.

मुनगंटीवार यांनी विरोधकांना चिमटे काढत, कधी कविता, कधी शेरो-शायरी सादर करत बजेट मांडले. मुनगंटीवारांनी यंदाचा 62 हजार 844 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. राज्य सरकार 38 हजार 892 कोटी कर्ज यावर्षी काढणार आहे. त्यामुळे राज्यावरील एकूण कर्ज 4 लाख 13 हजार 44 कोटी रुपये असेल. तर महसुली तूट 4511 कोटी रुपये आहे.
काय महाग, काय स्वस्त ?
महाग

ऑनलाईन, पेपर लॉटरी महागली, कर वाढवला
देशी विदेशी दारु महागली, कर वाढले

स्वस्त
स्वाईप मशीनवरील कर काढल्याने, मशीन्स स्वस्त
मिल्क टेस्टींग किटवरचा कर काढला
छोट्या शहरातील विमानतळांवरचे कर कमी केले
ऊस खरेदी कर माफ केला जाणार
शेततळ्यांकरता जिओमेंब्रेनवरील करमाफी
सॉईल टेस्टींग किटवरील करमाफी
विद्युतदाहिनी व गॅसदाहिनीवरचा करही शून्य

COMMENTS