राज्यात वादळी वा-यासह गारपीठीचा इशारा

राज्यात वादळी वा-यासह गारपीठीचा इशारा

दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 48 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस व गारपिटीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

सांगली व मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागातही पावसाचा तडाखा सोसावा लागला.काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसात द्राक्ष बाग, शेतकऱ्यांची समितीत पडून असलेली हजारो क्विंटल तूर भिजली.  लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तडाख्याचा पाऊस पडला आहे.यामुळे शेतकऱ्यांनी तयार करुन ठेवलेल्या ज्वारी खळ्यांचे नुकसान झाले. पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस झाला.पुण्यातील भोरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाले. तरसांगलीत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तिकडे चिपळूणमध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.

यंदाच्या वर्षी देशातील पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी वार्षिक सरासरीच्या96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवलेल्या मान्सूनच्या अंदाजाशीमिळताजुळता आहे. स्कायमेटने या वर्षी सरासरी 95 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे.

 

COMMENTS