राज्याला पुढे नेण्याऐवजी मागे नेणारा अर्थसंकल्प – राधाकृष्ण विखे-पाटील

राज्याला पुढे नेण्याऐवजी मागे नेणारा अर्थसंकल्प – राधाकृष्ण विखे-पाटील

राजकीय भाषणापलीकडे राज्याच्या जनतेला काहीच मिळाले नाही. सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना केवळ आश्वासनाची गाजरेच मिळाली. म्हणूनच आम्ही त्या अर्थसंकल्पाची होळीही केली.  असं विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांनी म्हटले आहे.

कर्जमाफीसाठी दिल्लीदरबरी गेलेल्या मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांनी कडाडून टीका केली आहे. पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत गेलेल्या या शिष्टमंडळाला वेळही दिला नाही तर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून केवळ आश्वासनं मिळाल्यानं सत्ताधा-यांनी केवळ कर्जमाफीचा फर्स केल्याचं विखे पाटील म्हणालेत.

सरकारचे कोणतेच उद्दीष्ट हा अर्थसंकल्प पूर्ण करू शकले नाही. सर्व आघाड्यांवर हे सरकर अपयशी आहे. राज्याला पूढे नेण्याऐवजी मागेच नेणारा हा अर्थसंकल्प आहे असं पाटील यांनी टीका केलीयं.

राज्यातील जनतेला गाजर दाखवणारा, शेतकऱ्यांना फसवणारा हा अर्थसंकपल्प आहे. राज्यपालांच्या भाषणातीलच काही पाणे अर्थमंत्र्यांनी वाचून दाखवली. कोणत्याही प्रकारचे नवा उपक्रम नाही. राज्याच्या आर्थिक परिस्थीतीतही निराशाजणक, असे या अर्थसंकल्पाचे वर्णक केली जाईल. केवळ मोठ्या घोषणा केल्या. शेतकरी कर्जमाफी किंवा सातव्या वेतन आयोगाबाबत कोणताही उल्लेख नाही. राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचे हा अर्थसंकल्प दाखवून देतो. जनतेच्या आपेक्षेला पाणे पुसण्याचे काम अर्थसंकल्पाने केले. अशी टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली.

COMMENTS