रावसाहेब दानवे यांचं काळे झेंडे दाखवून स्वागत !

रावसाहेब दानवे यांचं काळे झेंडे दाखवून स्वागत !

नंदूरबार – शेतक-यांविषयी अपशब्द काढल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर शेतक-यांचा संताप अजूनही कायम आहे. याची प्रचिती आज नंदूरबारमध्ये आली. भाजपच्या शिवार संवाद यात्रेसाठी दानवे आज नंदूरबारला आले होते. तेंव्हा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. तसंच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दानवेंना काळे झेंडे दाखवणार असा इशारा आधीच दिला होता. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांचीच संख्या मोठी होती.

 

COMMENTS